पेंडिंग बातमी.... २० तारखेला पाठवली होती.....
POL26B15627
पारोळा ः अग्निवीर सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील. शेजारी प्रशिक्षक तथा माजी सैनिक विठ्ठल पाटील आदी.
सैन्यभरती पूर्व प्रशिक्षणाचा
पारोळ्यातील विद्यार्थ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
पारोळा, ता. २२ ः येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यमाने अग्निवीर सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण अभियानाचे उद्घाटन नुकतेच झाले.
या अभियानात १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी ८ ते १० पर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल पाटील हे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. बी. भावसार, डॉ. ए. एस. महाले, डॉ. एस. बी. सावंत, ‘रासेयो’चे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एच. राठोड आदी उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रतिभा पाटील यांनी आभार मानले.
----------------------