प्राचार्य संबोधन कार्यक्रम

प्राचार्य संबोधन कार्यक्रम
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H30330 मोराणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात प्राचार्य संबोधन कार्यक्रमात बोलतांना प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ. शेजारी प्राध्यापक. --- स्वप्नपूर्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांसह जिद्द गरजेची --- प्राचार्य डॉ. गुंजाळ : समाजकार्य महाविद्यालयात प्राचार्य संबोधन कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : जीवनात मोठी स्वप्ने पाहणे आवश्यक असले तरी त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कर्तृत्व निर्माण करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी केले. समता शिक्षण संस्था, पुणे संचलित मोराणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे प्राचार्य संबोधन कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. प्रा. शामसिंग वळवी, प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा. डॉ. दिलीप घोंगडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गुंजाळ म्हणाले, की आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून भविष्यात समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करावा. स्वप्नपूर्तीसाठी सातत्य, शिस्त आणि कर्तृत्वाची गरज अधोरेखित करत तंत्रज्ञानाचा वापर केवळ ज्ञानवृद्धी व विधायक कामांसाठी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ सुशिक्षित न होता संवेदनशील व जबाबदार नागरिक बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वतःचा आणि आपापल्या विभागाचा परिचय देऊन कार्यपद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. मेघावी मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थीनी जिज्ञासा देवरे हिने सूत्रसंचालन केले. सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रमोद भुंबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com