फोटो : NSK26H30336
नंदुरबार : अद्वैत बलसाने, वेद वानखेडकर यांचा गौरव करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी.
--------------------------
अद्वैत बलसाने, वेद वानखेडेकर
यांची महाराष्ट्र संघात निवड
नंदुरबार, ता. २३ : येथील नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू अद्वैत बलसाने व वेद वानखेडकर या दोन्ही खेळाडूंनी टेनिस क्रिकेट स्टेट चॅम्पियशनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहिल्यानगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सतरा वर्षांआतील मुले व मुली टेनिस क्रिकेट स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे उत्साहात झाली. यामध्ये नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू अद्वैत बलसाने व वेद वानखेडकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने ३ ते ७ ऑक्टोबरला राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आठवी सतरा वर्षाआतील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्तरप्रदेश राज्यातील मथुरा येथे होणार असून, या स्पर्धेसाठी भारतातून २१ राज्यांचा सहभाग नोंदवणार आहेत. या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी अद्वैत बलसाने याची विकेट किपर बॅट्समन आणि वेद वानखेडकर यांची ऑल राऊंडर म्हणून महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली आहे. अद्वैत बलसाने, वेद वानखेडकर यांची उत्तरप्रदेश राज्यातील मथुरा येथे होत असलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते अद्वैत बलसाने, वेद वानखेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ चौधरी, चावरा इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का, सचिव संदीप खलाणे, सहसचिव दिनेश महाले, योगेश मोरे आदी उपस्थित होते.