धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 30335
साक्री : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मागणीचे निवेदन नायब तहसीलदार किरण कोठवदे यांना देताना मराठा सामाजिक परिषदेचे पदाधिकारी, शेतकरी, आदी.
--
साक्री तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
--
मराठा सामाजिक परिषद व शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २२ : साक्री तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी मराठा सामाजिक परिषद व तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे निवेदनातून तहसीलदारांकडे करण्यात आले. या मागणीचे निवेदन मंगळवारी (ता. २२) नायब तहसीलदार किरण कोठावदे यांनी निवेदन स्वीकारले.
तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या पूर्वार्धात झालेल्या एकमेव पावसानंतर आजअखेर कोणताही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरीपाची मका, बाजरी, भुईमूग, कपाशी, तूर आदी पिके करपू लागली असून, ती हाती येण्याची कोणतीही आशा उरलेली नाही. यामुळे तालुक्यात स्पष्टपणे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे व खते खरेदी केली आणि खरीपाच्या उत्पन्नाचे स्वप्न पाहिले होते त्यांचे स्वप्नभंग झाले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवणार आहे. शासनाने साक्री तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावा आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक साहाय्य देऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनावर मराठा सामाजिक परिषदेचे अध्यक्ष एन. एन. पाटील, कार्याध्यक्ष ॲड. नरेंद्र मराठे, सचिव प्रा. बी. एम. भामरे, कोषाध्यक्ष विलास देसले, सहसचिव माधवराव पाटील, दिनेश बोरसे, विकास देसले, नारायण भदाणे, एच. एन. पाटील, निंबा जाधव, शंकर पवार, अल्केश देसले, विजय भोसले, पंडित देवरे, भटू भामरे, भिकन पाटील, दीपक साळुंके, सुभाष कुवर, भास्कर अहिरराव, जगन्नाथ शिसोदे, सुनील सूर्यवंशी, पुष्पा कुवर, देवानंद बोरसे, चेतन खैरणार, इंद्रराज कोर, गोरख बहिरम, अनिल देवरे, भूषण बोरसे, हिरालाल अहिरे, काळू अहिरे, रमेश तोरवणे, रोहित गांगुर्डे, विजय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.