हिमांशू पानपाटील कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

हिमांशू पानपाटील कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
Published on
फोटो : NSK26H30342 नंदुरबार : नरेंद्र सराफ, डॉ. राजेंद्र पाटील, प्रशांत पाठक, संजय सैंदाणे, दिपक सोनवणे, नितीन कबाडे आदी मान्यवरांसह हिमांशू पानपाटील. -------------------------- हिमांशू पानपाटील कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १९ : वर्षांखालील गटात हिमांशू संजय पानपाटील याने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. ७० किलो वजन गटात त्याने प्रथम क्रमांक पटकावला. तो नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याची नाशिक विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा नंदुरबारातील जिल्हा क्रीडा संकुलावर पार पडली. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला- मुलींच्या विविध वयोगट व वजन गटांमध्ये खेळाडूंनी सहभाग घेतला. हिमांशूने कुस्तीच्या आखाड्यात आपल्या कौशल्यपूर्ण डावपेचांचे आणि जिद्दीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. प्रथम क्रमांक मिळवत त्याने डी. आर. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हिमांशूच्या या यशामागे क्रीडा शिक्षक नितीन कबाडे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि हिमांशूची मेहनत व जिद्द यामुळे त्याने हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नरेंद्रभाई सराफ, अध्यक्ष राहुल पाठक, उपाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य संजय सैंदाणे, उपप्राचार्य दीपक सोनवणे, क्रीडा शिक्षक नितीन कबाडे आदींनी कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com