धुळे ः टुडे २ साठी
--
फोटो क्रमांक ः 30341
धुळे : ओमप्रकाश अग्रवाल अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त खानदेश गोशाळा मैदानावर सभामंडप कामाचे भूमीपूजन करताना आमदार अनुप अग्रवाल. शेजारी मान्यवर.
--
‘ओपी’ अग्रवाल यांचा अमृतमहोत्सवी सोहळा
-
धुळ्यात चार ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रम; सांस्कृतिक मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : भाजपचे ज्येष्ठ नेते, उद्योगपती, अग्रवाल समाजाचे मार्गदर्शक तथा विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल उपाख्य ओपी शेट यांचा ७५ वा (अमृतमहोत्सवी) वाढदिवस पाच ऑक्टोबरला धुळ्यात साजरा होणार आहे. यानिमित्त ४ व ५ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरात जय्यत तयारी सुरू आहे.
यासंदर्भात ओमप्रकाश अग्रवाल अमृतमहोत्सव सत्कार सोहळा समितीची नुकतीच बैठक झाली. आमदार अनुप अग्रवाल, उद्योगपती कैलास अग्रवाल, माजी महापौर मोहन नवले, सुधाकर बेंद्रे, महेश घुगे, ॲड. समीर पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यानिमित्त चार ऑक्टोबरला सायंकाळी सहाला मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळा मैदानावर धार्मिक गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. यात ‘मेरा भोला है भंडारी’ फेम गायक हंसराज रघुवंशी (हिमाचल प्रदेश) आणि नवी दिल्ली येथील साधो बँड यांचे सादरीकरण होईल.
-
आमदारांचे आवाहन
कार्यक्रमाच्या व्यासपीठ व सभामंडपाचे विधिवत भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. आमदार अग्रवाल, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उद्योजक विनोद अग्रवाल, डॉ. श्रीराम भतवाल, उद्योजक संजय अग्रवाल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग, सुनील नेरकर, गोपाळ केले, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, प्रकाश पाटील, भाजप ‘बेटी बचाव-बेटी पढाव’च्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल, नगरसेवक ओमप्रकाश खंडेलवाल, डॉ. महेश घुगरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार व पाच ऑक्टोबरला होणाऱ्या विविध कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.
-
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
ओपीशेट अग्रवाल हे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त याच महाविद्यालयातील त्यांच्या काळातील सहयोगी आजी- माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा होणार आहे. यात श्री. अग्रवाल यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. इच्छुक आजी- माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपली नावे व मोबाईल क्रमांक ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांच्या ९४२२७ ७६३१८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवून नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-