धुळे : टुडे पान ३ साठी...मेन
--
फोटो क्रमांक : 30345, 30346
धुळे : लालबाग मारुती मित्र मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी अनुप अग्रवाल, डॉ. सुभाष भामरे, मायादेवी परदेशी, गजेंद्र अंपळकर, कमलाकर अहिरराव आदी. तर दुसऱ्या छायाचित्रात अथर्वशीर्ष पठणावेळी मायादेवी परदेशी, कल्पना महाले, जयश्री अहिरराव आदी.
--
धुळ्यात लालबाग राजाच्या चरणी मंत्री रावल नतमस्तक
--
गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठणासह विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : शहरातील संत जगनाडे महाराज स्मारकासमोरील लालबाग मारुती मित्र मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या नवसाला पावणार्या श्रीमंत लालबाग राजाच्या गणरायाची महाआरती नुकतीच उत्साहात पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि रावसाहेब गिरासे यांच्या प्रमुख हस्ते ही महाआरती झाली.
-
पालकमंत्री रावल यांनी लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने पालकमंत्री रावल यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री रावल यांनी शहर व जिल्ह्यातील सर्व जनतेच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. उत्सवाच्या निमित्ताने सोमवारी (ता. २१) सायंकाळी महिला मंडळातर्फे विशेष गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित महिलांनी सर्वांच्या सुख- समृद्धी, आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. अथर्वशीर्ष पठणानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, महापौर परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, कल्पना महाले व नागसेन बोरसे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
-
विविध उपक्रमांचे आयोजन
मंडळाचे मार्गदर्शक कमलाकर अहिरराव यांच्या मार्गदर्शनात हा संपूर्ण गणेशोत्सव शिस्तीत व उत्साहात साजरा केला जात असून, यादरम्यान विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सुनील चौधरी, धर्मेंद्र संन्यासी, पप्पू आहिरराव, भालचंद्र आहिरराव, प्रकाश आहिरराव, अध्यक्ष कल्पेश वाडेकर, कार्याध्यक्ष कल्पेश पवार, स्वागताध्यक्ष योगेश चौधरी, सहस्वागताध्यक्ष आदित भट, उपाध्यक्ष गौरव संन्यासी,सागर थोरात, प्रसिद्धीप्रमुख मयूर सूर्यवंशी, सहप्रसिद्धीप्रमुख आयुष चहाकर, सचिव विशाल मराठे, सहसचिव गौरव भतवाल, खजिनदार उमेश शिंदे, सहखजिनदार विनय खैरनार, राहुल माळी, निखिल चौधरी, आयेन चौधरी, यथार्थ पाटील, माजी अध्यक्ष बंटी वाडेकर, पवन मराठे, वेंकटेश आहिरराव, सतीश चव्हाण, नागेश देवकाते, शशी चौधरी आदी पदाधिकारी यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते संयोजन करत आहेत.