देखावा ठरतोय पर्वणी

देखावा ठरतोय पर्वणी
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... -- फोटो क्रमांक : 30352 धुळे : जय श्रीकृष्ण सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या श्री गणपतीच्या दर्शनावेळी उपस्थित पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी अनुप अग्रवाल, डॉ. सुभाष भामरे, मायादेवी परदेशी, गजेंद्र अंपळकर, भिकन वराडे आदी. -- जगन्नाथाचा आकर्षक सजीव देखावा ठरतोय पर्वणी -- धुळ्यात पुरीच्या धर्तीवर साकारलेल्या देखाव्याला नागरिकांचा प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : शहरातील गल्ली क्रमांक सात येथील जय श्रीकृष्ण सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त जगन्नाथ पुरी येथील प्रसिद्ध मंदिराच्या धर्तीवर भगवान जगन्नाथांचा एक आकर्षक आणि सजीव देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा सध्या शहरातील भाविकांसाठी आकर्षण ठरत असून, येथे दररोज नागरिकांची गर्दी होत आहे. या देखाव्यात आकर्षक मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या बोलक्या व सुंदर मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. या सजीव देखाव्याची कलाकुसर पाहण्यासाठी भाविक उपस्थित राहत असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या देखाव्यास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या हस्ते आणि उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाली. माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, रावसाहेब गिरासे, महादेव परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक रोहित चांदोडे, चेतन गवळी, विक्की परदेशी, आकाश भडांगे, पप्पू डापसे, जयेश मगर, मोहन टकले आदी उपस्थित होते. पालकमंत्री रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भिकन वराडे यांच्या नेतृत्वात या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक गोविंदा वराडे यांनी पुढाकार घेतला असून, माजी उपमहापौर वैशाली वराडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी संयोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com