धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 30356
शिरपूर : गणेशोत्सवनिमित्त शहरातील गणेश मंडळाच्या भेटीवेळी नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल. शेजारी मंडळाचे पदाधिकारी.
--
शिरपूरमध्ये नगराध्यक्षांच्या गणेश मंडळांना भेटी
--
मंडळांमध्ये आरती करत घेतले बाप्पाचे दर्शन; उपक्रमांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २२ : गणेशोत्सवानिमित्तशहर आणि तालुक्यात सध्या भक्तीमय तसेच उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे जोरदार आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, शिरपूर- वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष, विलेपार्ले केळवाणी मंडळ (मुंबई) चे उपाध्यक्ष तसेच आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे उपाध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी शहर आणि तालुक्यातील अनेक प्रमुख गणेश मंडळांना सदिच्छा भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि मनोभावे आरती केली.
-
चिंतनभाई पटेल यांनी विविध गणेश मंडळांच्या मंडपांना प्रत्यक्ष भेट देत बाप्पाची आरती केली. या वेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित भाविकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. विविध मंडळांनी उभारलेली आकर्षक सजावट, लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची त्यांनी माहिती जाणून घेतली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता तो सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि समाजसेवेचा संदेश देणारा लोकोत्सव ठरावा, यासाठी शिरपूरमधील गणेश मंडळांकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले. अनेक मंडळांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि इतर समाजोपयोगी उपक्रमांवर विशेष भर दिला आहे.
-
या दौऱ्यादरम्यान चिंतनभाई पटेल यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या राबविलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम कार्य मंडळांकडून होत असल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच, हा गणेशोत्सव अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम राखत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.