वाईन पर्यटनला प्रोत्‍साहनासाठी ''सुला''चे डिजीटल प्‍लॅटफार्म

वाईन पर्यटनला प्रोत्‍साहनासाठी ''सुला''चे डिजीटल प्‍लॅटफार्म
Published on
वाइन पर्यटनाला प्रोत्‍साहनासाठी ‘सुला’चा डिजिटल प्‍लॅटफॉर्म निवास आणि भेटींच्या बुकिंग होणार अधिक सुलभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : देशातील आघाडीची, सर्वाधिक पुरस्कारप्राप्त वाइन उत्पादक कंपनी सुला विनयार्डसने वाढत्या हॉस्पिटॅलिटी आणि वाइन पर्यटन व्यवसायासाठी ‘विझिटसुला डॉट इन’ या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण केले. या संकेतस्थळाद्वारे सुलाच्या विविध विनयार्ड डेस्टिनेशन्स, निवासाच्या सुविधा तसेच भेटीची ठिकाणे आणि बुकिंगच्या पर्यायांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. ‘सुला’च्‍या भेटीसाठी उत्‍सुक पर्यटकांसाठी हे नवे संकेतस्थळ सोपे, मोबाईल-फ्रेंडली डिजिटल व्यासपीठ ठरेल. येथे सुलाची विविध विनयार्ड डेस्टिनेशन्स, रिसॉर्टस, डे-व्हिजिट्स आणि इतर अनुभवांची माहिती सहजपणे पाहता येतील. त्यानंतर थेट बुकिंग करता येईल. नव्या उपक्रमामुळे सुलाच्या दोन डिजिटल प्लॅटफॉर्ममधील भूमिकाही स्पष्ट झाली आहे. सुला विनयार्डस डॉट कॉम हे संकेतस्थळ ब्रँड, वाइन, कंपनीची वाटचाल, विनयार्डस आणि शाश्वततेविषयीच्या उपक्रमांची माहिती देणारे व्यासपीठ राहील. विझिटसुला डॉट इन हे सुलाच्या हॉस्पिटॅलिटी आणि वाइन पर्यटन व्यवसायासाठी समर्पित डिजिटल व्यासपीठ असेल. पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन संकेतस्‍थळावर ‘स्‍टे’ आणि ‘बुक युअर एंट्री’ असे दोन पर्याय दिले आहेत. पर्यटकांना गरजेनुसार निवासाची किंवा विनयार्डसला भेट देण्याची निवड करून थेट बुकिंग करतील. डे-व्हिजिटसाठी सुला विनयार्डस, नाशिक, डोमेन सुला, बेंगळुरू आणि डोमेन रासा, दिंडोरी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांना द सोर्स ॲट सुला, बियॉन्ड बाय सुला आणि द हेवन बाय सुला या पर्यायांची माहिती व बुकिंग करता येईल. इन्‍फोः वाइन टुरिझमला चालना देणारा उपक्रम : ढवळे सुला विनयार्डसचे हॉस्पिटॅलिटी विभागाचे प्रमुख मोनित ढवळे म्हणाले, की व्हिजिट सुलाद्वारे पाहुण्यांना सुलामध्ये त्यांच्या वेळेचे नियोजन करताना आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विनयार्डसला भेट, वाइन टेस्टिंगचे नियोजन, डोमेन सुलाचा अनुभव किंवा नाशिकमधील आमच्या निवास पर्यायांपैकी एखादा पर्याय निवडण्यास सुलभता येईल. मोबाईल-फ्रेंडली डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सोयींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com