(बातमी आवश्यक)
NSK26H30367
जळगाव : ‘एनपीटीईएल कोर्स’मध्ये रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांसह इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. प्रीती अग्रवाल, संजय शेखावत व प्राध्यापक वृंद.
----
‘एनपीटीईएल कोर्स’मध्ये
रायसोनीची दमदार कामगिरी
उपशीर्षक
१९ ऑल इंडिया टॉपरसह १६ एलिट-गोल्ड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : रायसोनी महाविद्यालयाने एनपीटीईएलच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली असून, दोन सत्रांमध्ये तब्बल ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यामध्ये १६ विद्यार्थ्यांनी एलिट-गोल्ड, १६० विद्यार्थ्यांनी एलिट-सिल्व्हर, १९ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉपर, तर ७ जणांनी एनपीटीईएल सुपरस्टार अशी कामगिरी केली आहे.
या उपक्रमासाठी २४ फॅकल्टी मेंटर्स कार्यरत होते. एनपीटीईएलच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारची प्रथम उल्लेखनीय कामगिरी करणारे महाविद्यालय म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची नोंद झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
एनपीटीईएलच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.
--------
(चौकट)
एनपीटीईएल म्हणजे काय?
एनपीटीईएल अर्थात ‘नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग’ हा ऑनलाइन अभ्यासक्रमांचा उपक्रम असून, विविध विषयांतील ज्ञान व कौशल्यविकासासाठी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो.
--------