नंदुरबारात आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी

नंदुरबारात आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी
Published on
(पान १ ला मेन) फोटो : NSK26H30397 नंदुरबार : येथील संत कबीरदास व्यायामशाळेतर्फे साकारण्यात आलेला बद्रीनाथ प्रतिकृतीचा देखावा पा ================= फोटो : NSK26H30399 नंदुरबार : येथील शिवाजी रोड परिसरात असलेल्या महाराणा प्रताप सिंह युवक मंडळामार्फत साकारण्यात आलेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या पौराणिक कथेवर आधारित देखावा पाहण्यासाठी महिलांची झालेली गर्दी . ================= फोटो : NSK26H30395 नंदुरबार : येथील संत शिरोमणी कबीरदास व्यायामशाळेतर्फे साकारण्यात आलेला भगवान जगन्नाथ मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा. ================= नंदुरबारात गणेश आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी विविध मंडळांचा धार्मिक, सामाजिक प्रबोधनावर भर सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २२ : शहरासह जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त प्रबोधनपर देखावे सादर केले असून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. गणेश विसर्जनाला फक्त चार दिवस शिल्लक असल्याने देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नंदुरबार शहरातील ऐतिहासीक अशा दादा-बाबा गणपतीसह विविध मंडळांनी स्थापन केलेल्या गणरायाच्या मुर्तींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. शहरातील संत शिरोमणी कबीरदास व्यायाम शाळा, संत कबीरदास व्यायामशाळा, महाराणा प्रताप सिंह युवक मंडळ, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आदी मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. ----------------- फोटो : NSK26H30393 नंदुरबार : हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह बालशहीदांच्या बलिदानावर आधारीत देखावा. शहिद शिरीषकुमारांवर देखावा ‘ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी...जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी’ या गीतातून ८४ वर्षापूर्वी नंदनगरीत बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृती गणेशोत्सवात शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाने जागविल्या आहेत. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांशी लढा देणाऱ्या नंदुरबारातील हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या बलिदानाचा देखावा बालवीर चौकात मंडळातर्फे साकारण्यात आला आहे. हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. मंडळाने शहरातील माणिक चौक स्मारकाची प्रतिकृती उभारून पाचही बालवीरांचे बलिदान देखाव्यात प्रतिबिंब केले आहे. मंडळाने शाडू मातीची मूर्ती स्थापन केली असून, पारंपरिक वाद्याला प्राधान्य दिले आहे. आरास संकल्पना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांची आहे. ज्येष्ठ सल्लागार जी. एस. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, काशीनाथ गवळी, धिरेन हिरणवाळे, विशाल हिरणवाळे परिश्रम घेत आहेत. ------------------------ फोटो : NSK26H30392 धडगाव : नशामुक्ती जनजागृती पोस्टरचे अनावरण करताना अश्‍विनी सानप, निरीक्षक हेमंत पाटील, सुनील भाबड, विकास गुंजाळ, डॉ. संतोष परमार, डॉ. किरण निकवाडे, गणेश बोरकुल आदी. (छाया : सागर निकवाडे) --------- गणेशोत्वानानिमित्त नशा मुक्ती जनजागृती नंदुरबार, ता. २२ : युवा पिढीला विनाशाच्या गर्तेत आणि व्यसनाधिनतेच्या जाळ्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांविरुद्ध धडगाव शहरातील श्री नर्मदेश्वर सार्वजनिक गणेश मित्र मंडळ आणि नंदुरबार जिल्हा पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानिमित्ताने ‘अंमली पदार्थमुक्त नंदुरबारचा’ संकल्प करण्यात आला आहे. गणेशोत्सवात करण्यात येत असलेल्या समाजप्रबोधनपर उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेअंतर्गत नशा मुक्ती जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. व्यसनमुक्तीवर जनजागृती करून नर्मदेश्वर गणेश मंडळाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली आहे. या सोहळ्याप्रसंगी धडगावचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड, पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष परमार, डॉ. किरण निकवाडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश बोरकुल, पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, शिवसेना शिंदे गटाचे युवाप्रमुख योगेश पाटील, नगरसेवक कल्याणसिंग पावरा, सचिन जळोदकर, ऋषिकेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते राकेश पावरा, पोलिस कर्मचारी, श्री नर्मदेश्वर सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ------- अंमली पदार्थाच्या सेवनाने तरुण पिढी उध्वस्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून समाजात जनजागृती आवश्‍यक आहे. गणेश मंडळांनी हाती घेतलेला जनजागृतीचा उपक्रम प्रेरणादायी ठरेल. - अश्‍विनी सानप, पोलिस अधीक्षक, नंदुरबार -------- कोट---- आमच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून केवळ उत्सव साजरा करणे हेच उद्दिष्ट नसून समाजातील घातक व्यस्थांना आळा घालणे आणि युवकांना योग्य दिशा देणे हे आमचं सामाजिक कर्तव्य आहे. पोलिस प्रशासनाच्या साथीने आम्ही हे अभियान तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत. - नर्मदेश्वर गणेश मित्र मंडळ, धडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com