निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद

निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद
Published on
निरोगी उद्यासाठी आयुर्वेद : एक आरोग्य, एक भविष्य ------------------------------------------- ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ अशी यंदाच्या आयुर्वेद दिनाची मुख्य संकल्पना आहे. ‘एक आरोग्य, एक भविष्य : आयुर्वेदाचे एकत्रीकरण’ हे घोषवाक्य व्यक्ती, समाज आणि पर्यावरण यांना जोडणाऱ्या आयुर्वेदाची व्यापक आरोग्यदृष्टी स्पष्ट करते. बुधवारी (ता. २३) अकरावा आयुर्वेद दिन साजरा होत आहे, त्यानिमित्त... - डॉ. शशिकांत एच. कापडणीस आज मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी, निद्राविकार आणि ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित समस्या वाढत आहेत. आयुर्वेद केवळ रोग झाल्यानंतर उपचार करण्यावर भर देत नाही, तर रोगप्रतिबंध, आरोग्यसंवर्धन आणि संतुलित जीवनशैलीलाही महत्त्व देतो. ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् । आतुरस्य विकार प्रशमनम् ।’ या तत्त्वानुसार योग्य आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, व्यायाम, योग, पुरेशी झोप, मानसिक संतुलन, आवश्यक औषधोपचार आणि योग्य व्यक्तींमध्ये पंचकर्म यांचा समन्वित विचार केला जातो. यंदाच्या संकल्पनेत एकात्मिक आरोग्यसेवा, आयुर्वेदातील संशोधन व वैज्ञानिक पुरावे तसेच सामुदायिक कल्याण आणि शाश्वत जीवनशैली या विषयांवर भर देण्यात आला आहे. आयुर्वेदाच्या जागतिक वाटचालीत जागतिक आरोग्य संघटनेची भूमिकाही महत्त्वाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध धोरण २०२५-२०३४ मध्ये सुरक्षितता, गुणवत्ता, संशोधन, पुरावे आणि आरोग्य व्यवस्थेशी योग्य समन्वय यावर भर देण्यात आला आहे. जामनगर येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्र या क्षेत्रातील जागतिक सहकार्याला चालना देत आहे. परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा विवेकी संगम साधणे ही आजची गरज आहे. आयुर्वेदाचा खरा उत्सव एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आहार, दिनचर्या आणि जीवनशैलीत उतरला, तरच निरोगी आज आणि निरोगी उद्या घडेल. (लेखक केरळ येथे आयुर्वेदाचार्य, पंचकर्म विशेषज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com