(छायाचित्रे क्रॉप करुन घ्यावी)
फोटो : H30374
नाशिकः जाट समाज सेवा समिती ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह. समवेत उपस्थित समाज बांधव.
---
जाट समाजातर्फे ‘तेजा दशमी उत्सव’
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : जाट समाज सेवा समिती ट्रस्टतर्फे सत्यवादी वीर तेजाजी यांच्या तेजा दशमीनिमित्त साईलीला लॉन्स येथे कार्यक्रम झाला. या वेळी भजनसंध्या, भामाशाह सन्मान व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थित राहातांना, समाज बांधवांशी संवाद साधला.
आयुक्त शेखर सिंह यांनी सपत्नीक वीर तेजाजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजोन्नतीसाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमात कुंभवाणी गायक कलाकार कुंभाराम गोदारा यांनी भक्तिगीतांचे सादरीकरण केले, तर हरीराम किंवाडा यांनी सूत्रसंचालन केले. त्र्यंबक रोडवरील संदीप विद्यापीठासमोरील जागेवर जाट समाजाचे ‘जाट भवन’ उभारण्यात येत आहे. या भवनाच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कार्यक्रमादरम्यान समाजबांधवांकडून निधी संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार जाट समाज सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी खेताराम खोत, श्रीचंद रणवा, बनेसिंह झाडिया, त्रिलोकाराम कुडी, जैनाराम गुगडवाल, कानाराम गेट, हनुमान बेनीवाल, रामदेव डुडी, मुलतानाराम डुडी, राजेंद्र सिंह पिलानिया, रामकुमार चौधरी, अभयराम कादयान, ब्रिजमोहन चौधरी, कृष्णकुमार बेनीवाल आदींनी परीश्रम घेतले.