अखेर तलाठ्यांचा संप मागे

अखेर तलाठ्यांचा संप मागे
Published on
तलाठ्यांचा आठ दिवसांचा संप अखेर मागे निलंबन रद्द; मात्र विभागीय चौकशी सुरूच राहणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२२ : तलाठ्यांच्या आठ दिवसांच्या संपावर अखेर मंगळवारी (ता.२२) तोडगा निघाला. इगतपुरी तालुक्यातील एका मंडलाधिकाऱ्यासह पाच तलाठ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र, या सर्व कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. निलंबन मागे घेतल्याने तलाठ्यांनी संप मागे घेतला असून, ठप्प झालेले महसूल विभागाचे कामकाज पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील एका मंडलाधिकाऱ्यासह पाच तलाठ्यांच्या दफ्तर तपासणीतील अनियमिततेवरून प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी कारवाई केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा तलाठी महासंघाने कामबंद आंदोलन सुरू केले. प्रांताधिकाऱ्यांची बदली आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी महासंघाने केली होती. मागण्या मान्य होईपर्यंत कामावर न परतण्याची भूमिका घेतल्याने गेल्या आठ दिवसांपासून महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून महासंघाशी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी (ता. २२) तलाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. या चर्चेत निलंबन मागे घेण्यासोबतच संबंधित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू ठेवण्याचा मध्यममार्ग काढण्यात आला. त्यानंतर महासंघाने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, आठ दिवसांच्या कामबंद आंदोलनामुळे महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. संप मिटल्याने प्रलंबित कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. कोट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी झालेल्या चर्चेत निलंबन मागे घेतानाच विभागीय चौकशी सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने संप मागे घेत आहोत. विभागीय चौकशीतून समोर येणारा निर्णय आम्हाला मान्य असेल. - संजय गाढे, जिल्हाध्यक्ष, तलाठी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com