शिवसेना तालुकाप्रमुखांना मिळणार "बोलेरो''

शिवसेना तालुकाप्रमुखांना मिळणार "बोलेरो''
Published on
फोटो : 30376 नाशिक : ‘शिवसेना आपल्या दारी’ संकल्पनेतर्गत तालुका प्रमुखांना देण्यासाठी सज्ज असलेल्या गाडीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. … ‘शिवसेना आपल्या दारी’; तालुकाप्रमुखांना बोलेरोची ताकद दुष्काळ सर्वेक्षणासाठी गाड्यांचा वापर; २६ ला वितरणाची शक्यता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२२ : शिवसेना पक्षसंघटना ग्रामीण भागात अधिक मजबूत करण्यासाठी नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी ‘शिवसेना आपल्या दारी’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाप्रमुखाला एक बोलेरो गाडी देण्यात येणार असून, २६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १४ तालुकाप्रमुखांना या गाड्या देण्यात येणार आहेत. पक्षसंघटन वाढविण्यासोबतच शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि दुष्काळाच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. पक्षाच्या सर्वेक्षणासाठी दिल्लीतून आलेल्या पथकातील सदस्यही या वाहनांचा वापर करतील. गाड्यांचा वैयक्तिक कामासाठी वापर करता येणार नसून, पक्षसंघटनेला अनुकूल कार्यक्रमांसाठी त्यांचा वापर करता येणार आहे. प्रत्येक वाहनावर शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण चिन्ह तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची डिजिटल चित्रे लावण्यात आली आहेत. त्यामुळे तालुकाप्रमुखांची वाहने स्वतंत्रपणे ओळखता येणार आहेत. कोट तालुकाप्रमुखांना पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मतदारसंघात सातत्याने फिरावे लागते. या वाहनामुळे त्यांना गावोगावी पोहोचणे शक्य होईल. पक्षाचे काम अधिक गतीने करता येणार असून, त्याचा भविष्यात पक्षाला फायदा होईल. - आमदार सुहास कांदे, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com