दिवाळीनंतरच ई-रेशनकार्डला मुहूर्त

दिवाळीनंतरच ई-रेशनकार्डला मुहूर्त
Published on
ई-रेशनकार्डसाठी दिवाळीनंतरची प्रतीक्षा नंदुरबार, सिंधुदुर्गनंतर नाशिकचा दुसऱ्या टप्प्यात समावेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२२ : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्यासाठी अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना स्मार्ट ई-रेशनकार्ड देण्याची घोषणा होऊन दोन महिने उलटले, तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप वितरण सुरू झालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, दिवाळीनंतरच जिल्ह्यात ई-रेशनकार्ड वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुरवठा विभागाने जुन्या व जीर्ण शिधापत्रिकांऐवजी स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डच्या एका बाजूला लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती, तर दुसऱ्या बाजूला रेशन दुकान व इतर संबंधित माहिती असणार आहे. कार्ड मोफत देण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना शिधापत्रिका सांभाळण्याच्या अडचणीपासूनही दिलासा मिळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, पहिल्या टप्प्यात नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर कार्ड वितरण सुरू करण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कार्डधारकांना ई-रेशनकार्डबाबत अद्याप ठोस माहिती मिळत नसल्याने संभ्रम कायम आहे. पुरवठा विभागाकडून दिवाळीनंतर नाशिकमध्ये वितरणासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. आठ लाख लाभार्थ्यांना स्मार्ट ई-रेशनकार्ड जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांची संख्या सुमारे ७ लाख ९० हजार आहे. या सर्व शिधापत्रिकांच्या जागी स्मार्ट ई-रेशनकार्ड देण्यात येणार आहेत. नंदुरबार व सिंधुदुर्गनंतर दुसऱ्या टप्प्यात नाशिकमध्ये कार्ड वितरण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com