ॲंकर
शहर टुडे पान तीनसाठी
-------------------
NSK26H30382
जळगाव : गणेश मूर्ती विसर्जन मार्गाची मंगळवारी पाहणी करताना महापौर दीपमाला काळे, महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी आदी.
------
विसर्जनाच्या तोंडावर रस्त्याची दुरवस्था
--------
महापौरांची मक्तेदाराला तंबी; तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : अनंत चतुर्दशी अवघ्या तीन दिवसांवर असताना गणेश मूर्ती विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे व रस्त्यावर पसरलेली खडी महापालिका प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली. प्रभाग क्रमांक १५मधील सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गाची महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (ता.२२) सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित मक्तेदाराला दूरध्वनीवरूनच जाब विचारला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते व वाहनधारकांची मोठी वर्दळ या मार्गावर राहणार आहे. अशास्थितीत रस्त्यावरील खड्डे व मोठ्या प्रमाणात सांडलेली खडी अपघाताला निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे महापौरांनी पाहणीवेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत माहिती घेतली. रस्त्याची कामे वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल महापौरांनी संबंधित मक्तेदाराला स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. बुधवारी (ता.२३) सकाळपर्यंत मार्गावरील सर्व खड्डे बुजलेले दिसले पाहिजेत. रस्त्यावर सांडलेली खडीही तातडीने हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, महापालिका अभियंता योगेश वाणी, सेवा मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मार्ग सुरक्षितेसाठी
उपायोजना करा
विसर्जन मिरवणुकीपूर्वी मार्ग सुरक्षित व अडथळामुक्त करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गणेश मंडळांना विसर्जनासाठी येताना कोणताही त्रास होऊ नये, गर्दीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.