डेंग्यूचा डंख वाढला; ३७४ संशयितांपैकी २२ रुग्ण पॉझिटिव्ह

डेंग्यूचा डंख वाढला; ३७४ संशयितांपैकी २२ रुग्ण पॉझिटिव्ह
Published on
जळगाव जिल्ह्यात ‘डेंगी’चा डंख खोलवर --- ३७४ संशयितांपैकी २२ ‘पॉझिटिव्ह’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : जिल्ह्यात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असून, १८ सप्टेंबरपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ३७४ संशयित रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २२ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेषतः जामनेर, अमळनेर, भुसावळ आणि जळगाव तालुक्यांत संशयित रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जिल्हा हिवताप विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तालुकानिहाय अहवालानुसार जामनेर तालुक्यात सर्वाधिक ३५ संशयित रुग्णांपैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. अमळनेरमध्ये २९ पैकी १५ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची नोंद आहे. भुसावळमध्ये ३३ पैकी १८, तर जळगाव तालुक्यात २१ पैकी १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिवाय पारोळा येथे दोन संशयित, भडगावमध्ये १२, चाळीसगावमध्ये १३, पाचोरा येथे पाच, एरंडोलमध्ये २६, धरणगावमध्ये १०, चोपडा येथे ४५, रावेरमध्ये ७१, यावलमध्ये पाच, बोदवडमध्ये एक संशयित रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात एकूण ३४२ संशयित नमुन्यांपैकी १९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिका क्षेत्रात ३२ संशयित नमुन्यांपैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात चिकुनगुनियाच्या संशयित ९४ रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी केली आहे. मात्र, या तपासणीत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. चौकट नागरिकांना दक्षतेचे आवाहन पावसाळ्यानंतर अनेक भागांत पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, कूलर व इतर ठिकाणचे साचलेले पाणी नियमितपणे काढणे, तसेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com