चाळीसगावला सोमवारी वक्तृत्व स्पर्धा

चाळीसगावला सोमवारी वक्तृत्व स्पर्धा
Published on
चाळीसगावला सोमवारी वक्तृत्व स्पर्धा शेठ ना. बं. वाचनालयातर्फे आयोजन; सहभागाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २२ ः येथील शेठ नारायण बंकट वाचनालयातर्फे स्वर्गीय प्रा. सौ. मंदाताई व स्वर्गीय डॉ. श्‍यामकांत वा. देव स्मृतिकरंडक आंतरमहाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा सोमवारी (ता. २८) आयोजित करण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या कोणत्याही शिक्षण शाखेतील २५ वर्षे वयाच्या आतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना तसेच चाळीसगाव शहरातील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार’, ‘शिक्षण क्षेत्राकडून तरुणाईची अपेक्षा’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) समाजापुढील आव्हाने’, ‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ व ‘भारतीय संस्कृतीची जगाला देणगी’ हे विषय असून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा आवडता क्रांतिकारक’, ‘मला आवडलेले पुस्तक’, ‘माझे गाव माझी जबाबदारी’ व ‘पंढरीची वारी’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटातील स्पर्धकांना रोख रकमेची आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याकरीता नाव नोंदणीसाठी २५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. कोणत्याही महाविद्यालयाच्या व शाळेच्या जास्तीत जास्त तीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेचा पारितोषिक समारंभ त्याच दिवशी सोमवारी (ता. २८) दुपारी चारला चाळीसगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचनालयात होईल. उपस्थितीचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर, कार्यवाह राजेश ठोंबरे, निमंत्रक प्रा. मधुकर कासार व कार्यकारी मंडळाने केले आहे. ------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com