पतीसह नणंदेला जन्मठेप

पतीसह नणंदेला जन्मठेप
Published on
सेकंडमेन जिल्हा टुडे पान एकसाठी --------------- विवाहितेच्या खूप्रकरणी पतीसह नणंदेला जन्मठेप ---- भुसावळ न्यायालयाचा निकाल; दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २२ : चारित्र्याच्या संशयातून विवाहितेचा लाकडी ओंडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी पतीसह नणंदेला येथील न्यायालयाने मंगळवारी (ता.२२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल रतन साळुंखे (वय ३८) व सुनीता देवराम पवार (वय ४०, दोघेही रा. पांडुरंग टॉकीजसमोर, कुंभारवाडा, भुसावळ) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. दंड न भरल्यास प्रत्येकी एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणातील मृताचे नाव उषा अनिल साळुंखे (वय ३२) असे आहे. शहरातील पांडुरंग टॉकीजसमोरील कुंभारवाडा परिसरात २८ जुलै २०१७ला सकाळी ९ ते १०.१५ वाजेदरम्यान हा प्रकार घडला. अभियोक्ता पक्षाच्या प्रकरणानुसार आरोपी अनिल हा मृत उषाचा पती व सुनीता नणंद आहे. उषाच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर, हातावर, पायावर, पाठीवर व पोटावर मारहाण केल्याने उषाचा मृत्यू झाला. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३०/२०१७अन्वये भारतीय दंडसंहिता कलम ३०२ व ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला. एकूण १६ जणांच्या साक्षी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून २६ ऑक्टोबर २०१७ला दोषारोपपत्र दाखल केले. दोन जुलै २०१८ला न्यायालयात आरोप निश्चित झाले. खटल्यात ३४पैकी १६ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता विजय खडसे यांनी काम पाहिले. तपास तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात झाला. न्यायालयाचे आदेश दोन्ही आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २३५(२) अन्वये भारतीय दंडसंहिता कलम ३०२सह कलम ३४अंतर्गत शिक्षेस पात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरविले. त्यानुसार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. दरम्यान, आरोपी अनिलने ३० जुलै २०१७ ते ४ ऑक्टोबर २०१८दरम्यान भोगलेल्या कोठडीतील कालावधीचा शिक्षेतून वजावट (सेट-ऑफ) मिळण्यास तो पात्र असल्याचे आदेशात नमूद आहे. आरोपी सुनीताने ३० जुलै २०१७ ते १२ सप्टेंबर २०१८दरम्यान भोगलेल्या कोठडीतील कालावधीचा शिक्षेतून वजावट मिळण्यास ती पात्र असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com