पाच हजार मागितल्याने मित्राच्या पत्नीचा चिरला गळा

पाच हजार मागितल्याने मित्राच्या पत्नीचा चिरला गळा
Published on
NSK26H30404, NSK26H30406 जळगाव : घटनास्थळी दाखल झालेले पोलिस. दुसऱ्या छायाचित्रात जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात सतिशची विचारपूस करताना पोलिस. --- पाच हजारांसाठी मित्राच्या पत्नीचा चिरला गळा --- जळगावातील घटना; महिला जखमी, संशयिताला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : मित्राकडून घेतलेले उसनवारीचे पाच हजार रुपये त्याच्या पत्नीने परत मागितल्याचा राग आल्याने माथेफिरूने निवृत्तीनगरातील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ ३२ वर्षीय गृहिणीवर धारदार ब्लेडने हल्ला केला. मंगळवारी (ता. २२) दुपारी घडलेल्या या घटनेत महिलेचा गळा चिरला. जखमी अवस्थेतही तिने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी संशयिताला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. निवृत्तीनगरमध्ये गायत्री राजेंद्र पाटील (वय ३२) मंगळवारी दुपारी घरकाम आटोपून त्या दारात केस विंचरत असताना, त्यांचा पतीचा मित्र संशयित सतीश मोतीलाल शिंदे (वय ४३, रा. मयूर सोसायटी) घरी आला. गायत्री यांनी त्याच्याकडे उसनवारीचे पाच हजार रुपये परत मागितले. यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सतीशने धारदार ब्लेडने गायत्री यांच्या गळ्यावर वार केला. जखमी अवस्थेतही त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आरडाओरड ऐकून खालच्या मजल्यावरून त्यांचे जेठ-जेठाणीसह शेजाऱ्यांनी धाव घेतली. गळ्यातून रक्तस्राव होत असतानाही गायत्री यांनी जखम हाताने दाबत ‘त्याला पकडा, चाकू मारला’, असे ओरडताच दोघा-तिघांनी सतीशला पळून जाण्यापूर्वी पकडले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राजेंद्र यांनी जखमी पत्नीला खासगी रुग्णालयात, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकट संशयिताने दिली कबुली घटनास्थळी नागरिकांनी चोप दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सतीश मोतीलाल शिंदे (वय ४३, रा. मयूर सोसायटी) याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, जखमी गायत्री पाटील यांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे पाटील यांच्या घराबाहेर मोठा जमाव जमला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com