गुन्हेगार धुळ्यात अटकेत

गुन्हेगार धुळ्यात अटकेत
Published on
फोटो क्रमांक ः 30401 धुळे ः घरफोडी प्रकरणातील संशयितांसह चौकशीवेळी उपस्थित ‘एलसीबी‘चे पथक --- घरफोडी प्रकरणातील टोळीला बेड्या --- धुळे एलसीबीकडून दोघे ताब्यात; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ ः पुणे, सांगली, सातारा, रायगड, कोकण, मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगावातून ताब्यात घेतले. धुळे शहरातील पारोळा रोडवरील घरफोडी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून २० लाख ८२ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पारोळा रोडवरील सिद्धेश्वर हाईट्स येथे नीलेश खंडेलवाल यांच्या घरात २ सप्टेंबरला दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास घरफोडी झाली होती. कपाटातील रोकड, सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणातून दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांची माहिती मिळाली. त्यांच्या मागावर असताना, मयूर ऊर्फ अमित सोपान भुंडे-पाटील (वय ३९, रा. कृष्णकमल सोसायटी, नवनाथनगर, चाळीसगाव, मूळ रा. कोथरूड, पुणे) व ऋषभ भागवतप्रसाद जयस्वाल ( ३१, रा. छबय्या पार्क, बाळकुम रोड, कापूरबावडी, ठाणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ तोळे सोन्याचे दागिने, ८३९ ग्रॅम चांदीचे दागिने व नाणी, असा १९ लाख २२ हजार ७०० रुपयांचा ऐवज, ४९ हजार पाच रुपयांची रोकड, ११ हजारांचे दोन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली एक लाखाची दुचाकी (एमएच ४७, बीक्यू २१३०), असा एकूण २० लाख ८२ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मयूर भुंडेविरुद्ध पुणे, सांगली, वाई व रायगड जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे २७ गुन्हे दाखल आहेत. ऋषभ जयस्वालविरुद्ध मुंबईतील नागपाडा व ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक चेतन मुंढे, राहुल सानप, धर्मेंद्र मोहिते, आरिफ पठाण, शशिकांत देवरे, संतोष हिरे, अमोल पाटील व सुशील शेंडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com