कंपनीला भीषण आग

कंपनीला भीषण आग
Published on
NSK26H30407 भुसावळ : एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेली भीषण आग. ----- भुसावळच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ----- शेजारील ट्रान्सफॉर्मर कंपनीलाही बसली झळ सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २२ : तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक डी ६७ मधील ‘एन.आर.जे. फार्मा’ या केमिकल कंपनीला सोमवारी (ता. २१) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. केमिकल पदार्थांमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीची झळ शेजारील ट्रान्सफॉर्मर कंपनीलाही बसली. दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केमिकल कंपनीतील साहित्यामुळे आगीचा भडका वाढत गेल्याने परिस्थिती गंभीर बनली. आगीचे लोळ व धुराचे लोट परिसरात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलासह जळगाव, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र व वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. विविध ठिकाणांहून दाखल झालेल्या अग्निशमन पथकांनी संयुक्तपणे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनास्थळी दोन गायी मृतावस्थेत आढळून आल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले. आगीत दोन्ही कंपन्यांतील यंत्रसामग्री, साहित्य व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसानीचा नेमका आकडा संबंधित यंत्रणांच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com