फायरमन भरतीवर न्यायालयीन टांगती तलवार

फायरमन भरतीवर न्यायालयीन टांगती तलवार
Published on: 
टूडे साठी ---------- फायरमन भरतीवर न्यायालयीन टांगती तलवार निकषांच्या गोंधळाने उमेदवारांमध्ये संभ्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : महापालिकेच्या अग्निशमन विभागातील फायरमन पदभरती प्रक्रियेतील पात्रतेच्या निकषांवरून वाद निर्माण झाला असून, न्यायालयीन प्रकरणे निकाली निघेपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेच्या मूळ जाहिरातीत महाराष्ट्र अग्निशमन अकादमीचे प्रमाणपत्र असलेले उमेदवार पात्र ठरविले होते. त्यानंतर शुद्धिपत्रक काढून इतर संस्थांच्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली. महापालिकेच्या अधिकृत जाहिरातीवर विश्वास ठेवून राज्यभरातून अनेक उमेदवारांनी नाशिक गाठतं वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून तयारी केली आहे. मात्र, या भरतीविरोधात न्यायालयात खटले प्रलंबित असताना प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याने उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती, पात्रतेचे निकष आणि सर्व शुद्धिपत्रकांचा एकत्रित विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी भूमिका उमेदवारांनी मांडली आहे. प्रलंबित वाद कायदेशीर आणि न्याय्य मार्गाने सोडविल्याशिवाय भरती राबविल्यास अधिकृत जाहिरातीवर विश्वास ठेवणाऱ्या पात्र उमेदवारांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तातडीने निर्णय न झाल्यास राजीव गांधी भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा आदिनाथ हांडगे, मोहन पंडित, आदित्य शिरसाठ, सचिन वानखेडे, अर्जुन नागणे, किशन मराठे, प्रियांका चौधरी, साक्षी काजळे आदी उमेदवारांनी दिला आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com