NSK26H33966
जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज दाखल करताना सोनल पवार. शेजारी विद्यमान अध्यक्ष संजय पवार आदी.
---
डॉ. सतीश पाटलांसह १५६ अर्ज दाखल
---
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकूण ७३५ अर्जांची विक्री; आज अखेरचा दिवस
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी (ता. २९) बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, संचालक डॉ. सतीश पाटील, त्यांची पत्नी रेखा पाटील आणि पुत्र रोहन पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, आमदार अनिल पाटील, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील, आमदार किशााेर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, आमदार नंदकिशााेर महाजन, माजी महापौर जयश्री महाजन, कल्पिता पाटील यांच्यासह एकूण १५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (ता. ३०) शेवटचा दिवस आहे. यामुळे अर्ज भरण्यासह गर्दीचा उच्चांक होणार आहे. जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर आता वाढला आहे. संचालकपदाच्या केवळ २१ जागांसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत एकूण ७३७ अर्जांची विक्री झाली आहे. वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, मृणाल पाटील, कल्पीता पाटील, उदयसिंग पाटील, विजय पाटील, रामदास पाटील, ज्योती पाटील, पूनम पाटील, सतीश शिंदे, ताराचंद पाटील, संजय पवार, घनश्याम अग्रवाल, नलिनी पाटील, रमेश पाटील, राजीव पाटील, विनोद तराळ, पराग मोरे, इंदिराताई पाटील, तिलोत्तमा पाटील, शोभा पाटील, तनुजा मोरे, चंद्रकलाबाई पाटील, सुलोचना वाघ, मनीषा सूर्यवंशी, निर्मला पाटील, निर्मला महाजन, रोहिणी पाटील, शीतल ढोले, वैशााली पाटील, अमृता महाजन आदींनी अर्ज दाखल केले.
--------
दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील आणि जिल्हा समन्वयक विकास पवार यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांतील पदाधिकारी उपस्थित राहिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित भूमिका घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही उपस्थिती केवळ औपचारिक होती, की त्यामागे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय संदेश देण्याची रणनीती होती, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) असे दोन स्वतंत्र पक्ष आहे. जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
चौकट
स्वतंत्र पॅनल की सर्वपक्षीय आघाडी?
जिल्हा बँकेची निवडणूक दोन स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून लढवली जाणार, की सर्वपक्षीय आघाडी उभारणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विविध पक्षांच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या हालचालींमुळे संभाव्य युती आणि जागा वाटपाबाबत उत्सुकता वाढली आहे. सर्वपक्षीय आघाडीची शक्यता प्रत्यक्षात आली, तर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होऊ शकते. दुसरीकडे स्वतंत्र पॅनल उभे राहिल्यास निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.