शासकीय रुग्णालयातील दर्जेदार सुविधांसाठी प्रयत्न करणार

शासकीय रुग्णालयातील दर्जेदार सुविधांसाठी प्रयत्न करणार
Published on: 
फोटो : NSK26H34061 नंदुरबार : आरोग्य वर्धिनी समितीच्या सभेत बोलताना डॉ. हीना गावित. शेजारी डॉ. नरेश पाडवी व मान्यवर. ---------------- शासकीय रुग्णालयातील दर्जेदार सुविधांसाठी प्रयत्न डॉ. हीना गावित यांची ग्वाही सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३१ : तालुक्यातील लहान शहादा येथील आरोग्य केंद्र तसेच कोळदे व नांदरखे येथील उपकेंद्राला केंद्राच्या निकषांनुसार दर्जेदार आरोग्य सेवाविषयक मान्यता प्राप्त झाली आहे. तथापि, सर्वच शासकीय रुग्णालयांमधील सेवा केंद्रीय निकषानुसार दर्जेदार असावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पाठपुरावा करून सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील सुविधांचा अभाव आपण दूर करू, अशी ग्वाही माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची सभा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉ. हीना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून आरोग्य सेवेतील अडचणी समजावून घेतल्या. नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, शिक्षणाधिकारी जयंत चौरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अभिजित गांगुर्डे, महावितरणच्या अधिकारी मनीषा कोठारी, बालविकासच्या प्रकल्प अधिकारी सारिका गांगुर्डे, गणेश चव्हाण आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.