‘नमो ड्रोन दीदी’ प्रियांका मोहितेंची पॅरिसमधे डंका

‘नमो ड्रोन दीदी’ प्रियांका मोहितेंची पॅरिसमधे डंका
Published on: 
फोटो : 34428 नाशिक : प्रियांका मोहिते यांचा सत्कार करताना सीईओ ओमकार पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘प्रियांका’ चे भारताचे प्रतिनिधित्व ‘नमो ड्रोन दीदी’च्या कार्याची जागतिक स्तरावर दखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : पिंपळगाव बसवंत येथील ‘नमो ड्रोन दीदी’ प्रियांका मोहिते यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या ‘सियाल पॅरिस फूड बिझनेस २०२६’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अभिनंदन केले. मोहिते या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) स्वयंसहायता समूहाच्या सदस्या आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणीसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी ग्रामीण महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत. भारत सरकार आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) यांच्या निमंत्रणावरून त्यांना या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी भारतीय कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाचे उपयोग, ग्रामीण महिलांची उद्योजकीय क्षमता आणि महिला सक्षमीकरणातील त्यांचे योगदान जागतिक व्यासपीठावर मांडले. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.