ग्राम विकास मंडळ तर्फे शिक्षकांचा सन्मान

ग्राम विकास मंडळ तर्फे शिक्षकांचा सन्मान
Published on
NVL26B01120 चिंचखेडा : येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सजन अहिरे यांचा सत्कार करताना सुधीर तांबे. शेजारी दिलीप सोनवणे, प्रा. सुनील गरुड, सदानंद भावसार, डी. के. पवार आदी. --------- ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षण डॉ. सुधीर तांबे यांचे गौरवोद्‌गार; संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान सकाळ वृत्तसेवा नवलनगर, ता. ७ : ग्राम विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या योगदानामुळे संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. आज संस्थेची प्रगती होऊन सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे, असे गौरवोद्‌गार माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित विविध जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित असणाऱ्या शिक्षण संस्थेमधून उपक्रमशील शिक्षकांची निवड करून अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलमध्ये शिक्षक दिन व ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री ॲड. विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार दिलीप सोनवणे, सदानंद भावसार, मानद सचिव प्रा. सुनील गरुड, सुकाणू समितीचे अध्यक्ष डी. के. पवार, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, आर. एन. भालेराव, श्याम पवार, प्रा. संजय पाटील, नरेंद्र शिवाजी पाटील, प्राचार्य डॉ. विजय उभाळे, प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, प्रा. डॉ. यू. वाय. गांगुर्डे यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कोळपिंपरी येथील वीर जवान रोहित काटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे मानद सचिव प्रा. सुनील गरुड म्हणाले, उपक्रमशील शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने निवड करून त्यांच्या कामाचे योगदानाचे मूल्यमापन केले जाते. संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने वर्षभर विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, शिक्षक- पालक संपर्क मोहीम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच सुवर्ण महोत्सव कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील पाटील यांनी आभार मानले. प्राचार्य बी. डी. पाटील, व्ही. डी. पाटील, सुनील महाले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ----------- सन्मानित शिक्षक मुख्याध्यापिका अलकनंदा कैलास पाटील (इंदिरा गांधी कन्या विद्यालय, नवलनगर), आर्मी स्कूलचे उपशिक्षक बाळू देवराम पाटील, नितीन युवराज पाटील, तुळशीराम कहरसिंग पावरा (आर्मी स्कूल), अनिल त्र्यंबक पाटील (महाळशेवगे हायस्कूल), मुख्याध्यापक जयश्री गणेश पवार (आर्मी स्कूल, पनवेल), मुनीर हबीब तळवी, संगीता वामन महाले, योगेश मोतीलाल जाधव (मुख्याध्यापक, उदयनगर), सजन रामदास अहिरे (जय भवानी विद्यालय, चिंचखेडा), सुनील रामरतन पाटील, यशवंत पाटील, हिम्मत नरसिंग पाटील, किरण बाबूलाल बाविस्कर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com