NVL26B01123
नवलनगर : गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना विजय चित्ते, सुरेखा शिंदे.
-------------
गणेश मंडळ, घरगुती
मूर्तींची ७० टक्के नोंदणी
नवलनगर, ता. १० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला अंतिम टप्प्यात वेग आला आहे. यंदा बैलगाडीवरील गणपती, दगडू हलवाई, बाळ गणपती, फेटा व धोतर परिधान केलेल्या मूर्तींना विशेष मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. तर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळे व घरगुती गणेशोत्सवासाठी ७० टक्के मूर्तींची नोंदणी झाली आहे.
गणेशमूर्ती तयार करण्याचे काम धुळे शहर व ग्रामीण भागातील सुमारे ५० पेक्षा जास्त मूर्तिकारांकडे सुरू आहे. गणेशोत्सवाच्या साधारणतः सहा ते आठ महिने आधीच मूर्तिकार आपापल्या कामाला सुरुवात करतात. मूर्ती तयार करणे, रंगकाम, सजावट आणि अंतिम रूप देणे, अशी कामे घरातील सर्व घटक जबाबदारीने वाटून घेतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी कामाला वेग येतो. नकाणे येथील विजय सुदाम चित्ते व सौ. सुरेखा विजय चित्ते हे दांपत्य गेल्या २० वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत. यंदा त्यांनी ४५ प्रकारच्या विविध आकारात सहा इंचांपासून तीन फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या आहेत.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने यंदा मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साधारणतः २५ ते ३० टक्के दरवाढ झाल्याचे विजय चित्ते, राजेंद्र चित्ते, बापू चव्हाण, रामकृष्ण वाघ यांनी सांगितले.