फोटो : A13623
नाशिक : जप्त करण्यात आलेल्या मंगळसुत्रासह अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी- कर्मचारी.
--
मंगळसूत्र चोरीचा छडा;
संशयित महिलेस अटक
नाशिक, ता. १५ : अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरातून चोरी झालेल्या सोन्याच्या मंगळसूत्र प्रकरणाचा छडा लावून संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून ४ लाख ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले.
संगीता जगन्नाथ कुलकर्णी (४३, रा. शिवशक्ती चौक, सिडको) संशयित महिलेचे नाव आहे. तक्रारदार पद्मा मैंदरकर यांनी अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.११) तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचा तपास सुरू होता. गुन्हे शोध पथकातील शिपाई अनिल गाढवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिच्याकडून ३०.२० ग्रॅम वजनाचे सुमारे साडेचार लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, निरीक्षक शंकर वाघमोडे (गुन्हे) आणि निरीक्षक शिवाजी आहिरे (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, शिपाई समाधान शिंदे, मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीद ईनामदार, वैभव एखंडे यांनी कारवाई केली.