संगीत शिक्षकांच्या वेतनश्रेणी प्रश्नासाठी शिक्षण उपसंचालकांना निवेदन

संगीत शिक्षकांच्या वेतनश्रेणी प्रश्नासाठी शिक्षण उपसंचालकांना निवेदन
Published on
प्रलंबित वेतनश्रेणीचा प्रश्‍न सोडवा संगीत शिक्षक संघटनेची मागणी सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक ता.२२ : महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना, जिल्हा शाखेतर्फे संगीत शिक्षकांच्या प्रलंबित वेतनश्रेणीच्या प्रश्नाबाबत शिक्षण उपसंचालक संजीवकुमार राठोड यांना निवेदन देण्यात आले. सरकारने मागविलेली आवश्यक माहिती तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत राठोड यांना निवेदन देण्यात आले. अनेक दिवसांपासून संगीत शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यासाठी शासनाने माहिती मागीतली असल्याची बाबत बाब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपसंचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर राठोड यांनी संबंधित माहिती तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भातील पत्र नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि संगीत शिक्षकांनी सरकारकडे पाठविण्यासाठी आवश्यक माहिती विहित मुदतीत सादर करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक संघटनेचे राज्य सचिव भाऊसाहेब लोखंडे यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे राज्य सचिव भाऊसाहेब लोखंडे, खजिनदार दिनकर दांडेकर, तसेच तुकाराम तांबे, रामेश्वर धोंगडे, दिलीप पागेरे, संजय नवगिरे आणि ओंकार वैरागकर उपस्थित होते. 13959 नाशिक : शिक्षण उपसंचालकांना निवेदन देताना महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना पदाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

mantralay
Maharashtra primary teacher promotion stayed
The Maharashtra Education Department has made e-KYC mandatory, warning that August salaries will be withheld if the process is not completed.
zp schools
Marathi News Esakal
www.esakal.com