वाहतूक व्यवस्था होणार अधिक सक्षम

वाहतूक व्यवस्था होणार अधिक सक्षम
Published on
फोटो ः 13966 नाशिक : सुरळीत वाहतुकीसाठी ट्रॅफिक वॉर्डन यांना मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक. --- वाहतूक व्यवस्था होणार अधिक सक्षम कोंडी फुटणार ः २०० ट्रॅफिक वॉर्डनचे पोलिसांना बळ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विविध रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीची कामे वेगाने सुरू आहेत. या विकासकामांच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी २०० ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नवनियुक्त ट्रॅफिक वॉर्डनना सोमवारी (ता. २२) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांच्या ठिकाणी वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवणे, वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण मिळविणे यांबाबत या वॉर्डनना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पोलिस, मनपा आणि संबंधित यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय राखून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डननी अत्यंत जबाबदारीने कर्तव्य बजवावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. विकासकामे सुरू असतानाही नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करावे, असे त्यांनी सांगितले. या मार्गदर्शन प्रसंगी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. ...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com