मुख्य अंक पान तीन
-----------------------
13973
नाशिक : वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांना निवेदन देताना शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब
नाझिया खान, दिव्या सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करा
मुस्लिम बांधवांची मागणी; पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २३ : सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करत मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी इस्लाम नाझिया इलाही खान आणि दिव्या सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्यासह बडी दर्गा मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी यांना निवेदन दिले.
११ जून २०२६ रोजी प्रसारित झालेल्या एका पॉडकास्टमध्ये नाझिया खान आणि दिव्या सिंग यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करत अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. संबंधित वक्त्यांना अधिकृत ज्ञान नसताना केवळ समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानेच ही विधाने करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित कार्यक्रम सोशल मिडियावरून हटविण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्यासोबत हाजी हासिफ पीरजादा, हाफिज अजमोद्दिन, हनिफ बशीर, एजाज मकरांनी, अमजद मकरांनी, अल्ताफ पठाण यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.