13975
नाशिक : कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले टवाळखोर.
अंबडला पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
९० टवाळखोरांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नाशिक ता.२३ : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. कारवाईत ९० टवाळखोर संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली. पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.
ऑपरेशनदरम्यान पवननगर, उत्तमनगर, लेखानगर, कामटवाडा आणि अंबड गाव परिसरात धडक तपासणी करण्यात आली. कारवाईत ९० टवाळखोर संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ३ नॉन-बेलेबल वॉरंट, २ बेलेबल वॉरंट आणि ६ समन्सची बजावणी करण्यात आली. पोलिसांनी हद्दीतील १० तडीपार आणि १२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली. यापैकी ६ संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. याशिवाय २२ ठिकाणी स्टॉप अँड सर्च मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत इंदिरानगर, एमआयडीसी, अंबड पोलिस ठाणे, अंबड गुन्हेशाखा तसेच गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ येथील ६ अधिकारी आणि ३३ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.