मेळा बसस्थानकात ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाचा शुभारंभ, प्रवाशांना प्रवासातच ज्ञानाची मेजवानी

मेळा बसस्थानकात ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाचा शुभारंभ, प्रवाशांना प्रवासातच ज्ञानाची मेजवानी
Published on
पान चार ॲंकर ------------------ 13977 नाशिक : मेळा बस स्थानकात प्रवाशांसाठी उपलब्ध झालेले फिरते वाचनालय. मेळा बसस्थानकात ‘फिरते वाचनालय’ प्रवाशांना स्थानकात मिळणार ज्ञानाची मेजवानी सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक ता.२३ : मेळा बस स्थानकात ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता.२३) झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून फिरते वाचनालय महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना बसस्थानकात पुस्तकाच्या रूपाने ज्ञानाची मेजवानी मिळणार आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. प्रवासाचा वेळ अधिक ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरणार आहे. उपक्रमाच्या प्रारंभी सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे फिरत्या वाचनालयासाठी १०० पुस्तकांची भेट देण्यात आली. याशिवाय विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती तसेच आगारातील चालक, वाहक, यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीही पुस्तकांचे योगदान देत या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले. यामुळे वाचनालयात २१० पुस्तके जमा झाली. मेळा बसस्थानकास ही सुविधा सटाणा बसस्थानक येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यास सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथसचिव देवदत्त जोशी, सावानाचे कार्यवाह सुरेश गायधनी, दिलीप अहिरे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, नाशिक १ आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक दादाजी महाजन, यांत्रिक आगार व्यवस्थापक प्रतापसिंह राजपूत, कर्मचारी वर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण यांच्यासह नाशिक १ आगारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाचन संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना व्यक्त केली. प्रवाशांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘फिरते वाचनालय’ उपक्रम निश्चितच समाजोपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपक्रम यशस्विीतेसाठी वाहतूक नियंत्रक राजाराम मथुरे, स्थानक प्रमुख विवेक शेवाळे, वरिष्ठ लिपिक अलका गांगुर्डे आणि डी. आर. सानप यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com