खोडे नगर परिसरातील लॉन्सच्या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा

खोडे नगर परिसरातील लॉन्सच्या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा
Published on
मेन फोटो : A13982, A13981 नाशिक : जेसीबीच्या साह्याने काढण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण --- तीन लॉन्ससह २० पत्र्यांची शेड भुईसपाट पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव कारवाई; मनपाची मोठी कारवाई सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २४ : अनधिकृत बांधकाम विरोधात महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. बुधवारी (ता. २४) खोडेनगर पखाल रोडवरील लॉन्स धारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. तीन लॉन्सचे अतिक्रमण काढत इतर रस्त्याला अडथळा ठरणारे पत्र्याचे शेड आणि दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. बुधवारी सकाळी कारवाईस सुरुवात करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभाग उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनात पूर्व विभागीय अधिकारी हेमंत झुटे, पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, नगरनियोजन विभागाचे शाखा अभियंता प्रवीण थोरात, विनायक जाधव आणि गुणवंत वाघ, अतिक्रमण विभागाचे पथक समन्वयक जीवन ठाकरे, अनिल लोहकरे, प्रवीण बागुल, विद्युत विभागाचे राजू झोळेकर तसेच ठेकेदार पद्धतीवरील सुमारे ६० कर्मचारी तसेच एनडीएस विभागीय पथक प्रमुख अविनाश पाटील यांनी कारवाई करत अनधिकृत अतिक्रमण हटविले. सुमारे दोन ते तीन तास कारवाई सुरू होती. कारवाईत खोडेनगर मार्ग येथील सर्व्हे क्रमांक १३ (पै) व १४ (पै) मधील कोथमिरे लॉन्स, ड्रीम लॉन्स, गोल्डन (लॉन्स) प्रॉपर्टीज, आणि रस्त्याला अडथळा ठरणारे तसेच अनधिकृत बांधकाम केलेले दमदार स्क्रॅप सेंटर, चिकन, मटण दुकाने, अनधिकृत टपऱ्या, सुमारे २० पत्र्याचे शेड्स यासह विविध अतिक्रमणे हटविण्यात आली. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त सुधाकर सुरवाडकर यांच्या उपस्थितीत मुंबई नाका ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी, म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक सोहम माच्छवे यांच्यासह १५० अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात होते. त्यामुळे परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. ---चौकट यांचा होता समावेश जेसीबी २ गॅस कटर १ पूर्व विभाग अतिक्रमण पथक २ ट्रक पश्चिम विभाग अतिक्रमण पथक २ ट्रक इतर वाहने ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com