कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित जेरबंद

कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित जेरबंद
Published on
फरारी संशयितास गुन्हे शाखेकडून अटक नाशिक : जुन्या वादातून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरारी झालेल्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोन पथकाने जेरबंद केले. राहुल शांताराम जाधव (३१, रा. सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. पुढील कारवाईसाठी संशयितास सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांना संशयित महादेववाडी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक संजय सानप, सहायक उपनिरीक्षक मनोहर शिंदे, हवालदार चंद्रकांत गवळी, अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे व अंमलदार जितेंद्र वजीरे यांनी सातपूर येथील कमानीजवळ, महादेववाडी परिसरात सापळा रचून संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com