अल्पवयीन मुलावर लोखंडी फायटरने हल्ला

अल्पवयीन मुलावर लोखंडी फायटरने हल्ला
Published on
अल्पवयीन मुलावर फायटरने हल्ला जुने नाशिक : जुन्या वादातून अल्पवयीन मुलावर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची घटना मुलतानपुरा भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सादिक कुरेशी ऊर्फ सद्दू, मुशरीफ मनियार आणि कैफ शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २२) घरासमोर झालेल्या किरकोळ वादानंतर संशयितांनी अल्पवयीनावर फायटरने हल्ला केला. संशयितांच्या पालकांनी माफी मागितल्याने तक्रार देण्यात आली नव्हती. मात्र, गुरुवारी (ता. २५) मुलतानपुरा परिसरात संशयितांनी पुन्हा अल्पवयीनास अडवून मारहाण केली. सादिक कुरेशी याने लोखंडी फायटरने डोक्यावर आणि हातावर वार केला, त्यात तो गंभीर जखमी झाला. अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलांच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com