अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास
Published on
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपीस सात वर्षांची शिक्षा पॉक्सो कायद्यान्वये दोषी ठरवत नुकसानभरपाई देण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : अल्पवयीन मुलीला बिस्कीट आणि पापडाचे आमिष दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी रोहित सुर्वेशकुमार छाबरा (वय ४४, रा. गोदावरीनगर, पंचवटी) यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच तीन हजार रुपये दंड व पीडितेला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले. ही घटना ९ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी वज्रेश्वरीनगर, पंचवटी येथे घडली होती. तक्रारदाराच्या ओळखीचा असलेल्या आरोपीने घरात कोणी नसल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीला खाण्याचे आमिष दाखवत गैरवर्तन केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी तपास करून सबळ पुरावे गोळा करत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. तक्रारदार, साक्षीदार व पंचांच्या साक्षींसह परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक एकमध्ये न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर शुक्रवारी (ता. ४) सुनावणी पूर्ण झाली. आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल. तसेच पीडितेला एका महिन्यात ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले असून, ती न दिल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर व आर. पी. गावीत यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार रंजना गायकवाड, पैरवी पोलिस हवालदार सोमनाथ गावित व पोलिस अंमलदार विक्रांत नागरे यांनी खटल्याच्या कामकाजासाठी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com