आले गणराया मालिका : मंडळाचे देखावे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात

आले गणराया मालिका : मंडळाचे देखावे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात
Published on
लोगो : स्वागत गणरायाचे -- फोटो : A14727 नाशिक : सार्वजनिक मंडळाचे देखावे उभारण्याचे अंतिम टप्प्यात सुरू असलेले काम -- देखावे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात स्थापनेची सर्वत्र लगबग; उत्साहाचे वातावरण जुने नाशिक, ता. ११: अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने बाप्पाच्या स्थापनेची सर्वत्र जोरदार लगबग दिसून येत आहे. उत्सवाच्या विविध तयाऱ्यांनी वेग घेतला असून, सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठही गणेश भक्तांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. सोमवारी (ता. १४) घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. यंदा बाप्पाचा मुक्काम १२ दिवस असणार असून, त्यानिमित्ताने सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक व जनजागृतीपर लहान-मोठे देखावे उभारले जात आहेत. आगामी सिंहस्थ कुंभपर्व लक्षात घेता, यंदा धार्मिक देखाव्यांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. विविध ठिकाणी कारागिरांकडून देखावे साकारण्याचे काम वेगाने सुरू आहे. भद्रकाली धान्य बाजार परिसरात थ्रीडी इफेक्टमध्ये विठ्ठल मंदिराचा धार्मिक देखावा उभारला जात आहे. याशिवाय विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि पौराणिक मंदिरांचे थ्रीडी कट-आऊट्स तयार केले जात आहेत. उत्सव जवळ आल्याने कारागीर रात्रंदिवस एक करून आपली कला साकारत आहेत. काही मंडळांचे देखावे पूर्ण झाले असून, मंडपात मूर्तींची स्थापना केली जात आहे. ज्या घटनेवर देखावा आधारित आहे, त्यानुसार दृश्यांची जोडणी सुरू आहे. चलचित्र देखाव्यांसाठी इलेक्ट्रिक मोटर लावून ती योग्य रीतीने चालते की नाही, याची तपासणी केली जात आहे. पदाधिकाऱ्यांकडून उत्सवाचे इतर नियोजनही वेगाने सुरू आहे. घरगुती आरास उभारण्यात चिमुकलेही मागे नाहीत. साहित्य जमवणे, मांडणी करणे आणि १२ दिवसांचे नियोजन करण्यात बालचमूंमध्ये विशेष उत्साह दिसत आहे. दुसरीकडे, सार्वजनिक मंडळे महापालिका व पोलिसांची परवानगी मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचे नियोजनही सुरू आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com