14840
नाशिक : मुंबई येथील शीघ्रकृती दलाच्या जवानांकडून करण्यात आलेला रूट मार्च.
संवेदनशील मार्गावर शीघ्र कृती दलाचा रूट मार्च
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.२१: गणेश विसर्जन मिरवणूक निमित्ताने भद्रकाली पोलिसांचा शीघ्रकृती दल समवेत संवेदनशील मार्गावरून रूट मार्च करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी (ता.२१) सायंकाळी रूट मार्च करत संवेदनशील भागांची माहिती शीघ्रकृती दलाच्या जवानांनी जाणून घेतली.
आगामी गणेश विसर्जन मिरवणूक आणि जुलूस-ए-गौसिया दोन्हीही मिरवणुका उत्साहात आणि शांततेत संपन्न व्हावेत, कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता घेत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर वाचक निर्माण व्हावा. बंदोबस्तासाठी आलेले मुंबई येथील शीघ्र कृती दलास संपूर्ण भागाची माहिती असावी. विशेष करून संवेदनशील भागांची माहिती करून घेण्यासाठी सोमवारी (ता.२१) रोजी सायंकाळी भद्रकाली पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला.
वाकडी बारव, चौक मंडई, कसई वाडा, मोठा राजवाडा, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, भोई गल्ली, आझाद चौक, प्रमोद गल्ली, दंडे हनुमान चौक, मुलतानपुरा, कोकणीपुरा, दूध बाजार, त्र्यंबक चौकी चौक, खडकाळी, फुले मार्केट मार्गे पोलीस ठाणे असा रूट मार्च करण्यात आला.