14844
नाशिक : पूर्व विभागाकडून गणेश विसर्जनासाठी करून देण्यात आलेली कृत्रिम तलावाची व्यवस्था.
गणेश विसर्जनासाठी
पूर्व विभागात सहा कृत्रिम तलाव
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.२२: गणेश विसर्जन निमित्ताने महापालिकेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. पूर्व विभागात ९ ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे. त्यात ६ कृत्रिम तर ३ नैसर्गिक स्रोतांचा समावेश आहे. शुक्रवारी (ता.२५) गणरायाचे विसर्जन होणार आहे. यासाठी महापालिकेकडून तयार करण्यात आली आहे. यात पूर्व विभागात ९ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यात ३ नैसर्गिक स्रोत आहेत. तर सहा ६ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. प्रभाग १४,१५ आणि १६ अशा तीनही प्रभागात प्रत्येकी एक नैसर्गिक स्रोत आहेत. तर कृत्रिम तलावाचा विचार केला तर प्रभाग १६ मध्ये २, प्रभाग २३ मध्ये १ आणि प्रभाग ३० मध्ये ३ असे तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह मूर्ती संकलन व्यवस्थादेखील असणार आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी कृत्रिम तलावाचाच वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नैसर्गिक स्रोत देखील भाविकांना गणेश विसर्जनासाठी खुले आहेत.
---------------
नैसर्गिक स्रोत
प्रभाग १४...............अमरधाम घाट
प्रभाग १५...............लक्ष्मीनारायण घाट
प्रभाग १६...............गोदावरी नंदिनी नदी संगम घाट
कृत्रिम तलाव
प्रभाग १६.................रामदास स्वामी मठ
प्रभाग १६.................रामदास स्वामी नगर
प्रभाग २३.................डीजीपी नगर
प्रभाग ३०.................साईनाथ नगर चौफुली
प्रभाग ३०.................कलानगर इंदिरानगर
प्रभाग ३०.................युनिक ग्राउंड राजीव नगर