महाआवास योजनेत
दिक्षी राज्यात अव्वल
----------
ओझर, ता.१४ ः राज्य सरकारतर्फे महाआवास योजनेंतर्गत उत्कृष्ट कामाबद्दल दिला जाणारा पुरस्कार यंदा निफाड तालुक्यातील दिक्षी ग्रामपालिकेला मिळाला आहे. सातारा येथे त्याचे वितरण होणार आहे. या संदर्भात ग्रामपालिकेला नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे
राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून वेगवेगळ्या विभागात ग्रामविकास मंत्रालयातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यत येते. यात महाआवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी दिक्षी ग्रामपालिकेने केली आहे. जिल्हा परिषदेने काही गावांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये दीक्षी ग्रामपालिकेची निवड झाली आहे. आमदार दिलीप बनकर, खासदार भास्कर भगरे यांनी सरपंच डॉ योगेश्वर चौधरी,उपसरपंच भूषण चौधरी सर्व ग्रामपालिक सदस्य ग्रामविकास अधिकारी सतीश त्रिभुवन यांचे अभिनंदन केले. दरम्यान ‘या योजनेच्या माध्यमातून गावात दर्जेदार कामे करण्यात आली. योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढील काळातही चांगली कामगिरी करत राहू, हा सन्मान ऊर्जा देणारा आहे अशी प्रतिक्रिया सरपंच डॉ. योगेश्वर चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
--------------