फोटो- 14080
ओझर मिग ः योग दिनानिमित्त योगासने करताना प्राध्यापक व शिक्षक.
ओझर महाविद्यालयात
प्राध्यापकांची योगासने
ओझर ः ओझर मिग येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात योग दिनानिमित्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासने केली. प्राचार्य डॉ. डी. डी. लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक सौदागर यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करीत त्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. डी. एस. बोराडे व कला विभागप्रमुख प्राध्यापक शंकर आवारे, डॉ. आशा कदम, प्रा. डी. एस. गोडगे यांनी संयोजन केले. योगशिक्षिका सपना महतो यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. पोपट खाडे यांनी आभार मानले.