''जनशांती धाम'' आश्रमात
विद्यार्थी वसतिगृहाचा शुभारंभ
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता. २४ : येथील जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम येथे सुसज्ज वसतिगृहाचा शुभारंभ शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या उपक्रमामुळे शिक्षणासाठी बाहेरगावी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, संस्कारयुक्त आणि आपुलकीचे निवासी वातावरण उपलब्ध होणार आहे.
--
तरुण पिढीला योग्य दिशा, धर्माची शिकवण आणि संस्कार मिळावेत यासाठी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पन्नास वर्षांपूर्वी या वसतिगृह परंपरेचा शुभारंभ केला होता. तीच परंपरा स्वामी शांतिगिरीजी महाराज अखंडपणे चालवत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी आता नवीन इमारतीत भव्य हॉल, सुसज्ज निवासी व्यवस्था, स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी वसतिगृह निरीक्षक व व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे अत्यंत नाममात्र सेवा देणगीत, तर गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.
या शुभारंभप्रसंगी हृदयानंद माऊली, ज्ञानेश्वर भुसे, व्यवस्थापक संतोष अनवट, अमर आढाव, प्राचार्य ज्ञानेश्वर भालेराव, आनंद आचारी, सुभाष भडके, महेशगुरू शिवपुरी, संदीपगुरू मिश्रा, बाळासाहेब गोडसे, रामनाथ अनाठे, ओमकार पोमनार, आकाश दळवी, गौरव पवार, दीपक जाधव, ओम गाडे यांच्यासह आश्रमीय सेवक व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
फोटो ः 14106
ओझर ः येथे जनशांती धाम आश्रमात वसतिगृहाच्या शुभारंभप्रसंगी हृदयानंद माऊली, ज्ञानेश्वर भुसे, संतोष अनवट आदी.
---