ओझर येथे शब्द स्पंदन काव्यसंग्रहाचा प्रकाशन

ओझर येथे शब्द स्पंदन काव्यसंग्रहाचा प्रकाशन
Published on
ओझर येथे किशोर कदम यांच्या ‘शब्द स्पंदन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ओझर, ता. २५ : येथील सामाजिक कार्यकर्ते व कवी किशोर कदम यांच्या ‘शब्द स्पंदन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन मविप्रच्या ओझर महाविद्यालय, टिळकनगर येथे ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडीक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार तथा कवी नानासाहेब बोरस्ते होते. यावेळी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक शिवाजी गडाख, भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे उपस्थित होते. महाडीक व बोरस्ते यांनी साहित्याचे महत्त्व विशद केले. किशोर कदम यांनी काव्यसंग्रहाची प्रेरणा सांगितली. प्रा. बी. टी. शिंदे यांनी सूत्रसंचालन, प्रा. श्रद्धा कदम यांनी आभार मानले. विलास पोतदार, साहित्यप्रेमी, ग्रामस्थ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. OZM26B14111 ओझर : येथील मविप्र महाविद्यालयात किशोर कदम यांच्या शब्द स्पंदन काव्यसंग्रहाचा प्रकाशन करतांना प्रसिद्ध कवी व साहित्यिक लक्ष्मण महाडीक शिक्षक आमदार व कवी नानासाहेब बोरस्ते सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, बाळासाहेब शिरसागर, शिवाजी गडाख, यतीन कदम, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com