विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीविरोधात ओझर पोलिसांत तक्रार

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीविरोधात ओझर पोलिसांत तक्रार
Published on
पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या ओझरला पतीविरोधात तक्रार दाखल ---------------- सकाळ वृत्तसेवा ओझर, ता.३१ : येथील एअरफोर्स सर्व्हट क्वॉर्टरमध्ये २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. पैशांच्या मागणीसाठी पतीकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या आईने फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी ओझर पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत खुशी हिची आई भारती बापू खरात (रा. इंदिरानगर, नामपूर, ता. सटाणा) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार खुशीचा विवाह राहुल अशोक आहिरे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर ती पतीसोबत ओझर येथील एअरफोर्स क्वॉर्टर क्रमांक ३०१ मध्ये राहत होती. राहुल हा सतत पैशांची मागणी करून खुशीचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नवीन घर घेण्यासाठी एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी संशयिताने केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पैसे देणे शक्य नसल्याचे सांगूनही तिचा छळ सुरूच असल्याचा आरोप आहे. दरम्यान, १३ ऑगस्ट २०२६ ला रात्रीच्या सुमारास राहुलने खुशीच्या कुटुंबीयांना फोन करून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. खुशीच्या मृत्यूबाबत तिच्या आईने राहुल आहिरे याच्यावर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नीलिमा डोळस तपास करत आहेत. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com