डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा : पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी शांतता समितीच्या बैठकीत महावितरणच्या समस्यांचा पाऊस; नागरिकांच्या विविध मागण्या

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा : पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी शांतता समितीच्या बैठकीत महावितरणच्या समस्यांचा पाऊस; नागरिकांच्या विविध मागण्या
Published on
पान-३ डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा कुलकर्णी ः शांतता समिती बैठकीत महावितरणच्या समस्यांचा पाऊस सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. ७ ःगणेशोत्सव साजरा करताना डीजेचा (डॉल्बी) वापर टाळावा. ध्वनी मर्यादेचे पालन करून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, सामाजिक बांधिलकी जपावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ओझरचे प्रभारी निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिला. ----------- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील दुर्गामाता मंदिरात शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले चौक ते धन्वंतरी कॉर्नर परिसरातील सर्व वाहनांची पार्किंग उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत करण्यात यावी. विष्णू डेअरी ते मारुती वेस येथील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले. महावितरणच्या कारभारावर नाराजी या बैठकीत महावितरणविषयी समस्यांचा पाऊस पडला. वीज जोडणीसाठी महावितरणकडून अनामत रक्कम घेतली जाते, मात्र ती आजवर मंडळांना परत मिळालेली नाही. प्रीपेड मीटरची सक्ती केली जाते. हायव्होल्टेज तारांची उंची कमी असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. वीज वितरणचे अभियंता घनश्याम कुंभार व खाडे यांनी उत्सव काळातील वीज जोडणी व तत्सम सुविधांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनीष मंडलिक, प्रकाश महाले, प्रशांत पगार आदींनी समस्या मांडल्या. बैठकीस सर्व मंडळांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. १६-१ बैठकीतील प्रमुख मागण्या - गावातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत. - कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे मंडळांना वीज जोडणी द्यावी व रात्रीचे भारनियमन न करता वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. - गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेने कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, जेणेकरून कोणतीही अघटित घटना घडणार नाही. - गावातील बंद पथदिवे (स्ट्रीट लाईट) दुरुस्त करावेत आणि विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. - गणेश आगमन सोहळ्याप्रसंगी महामार्गावर NHAI चे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. - उत्सवकाळात रस्त्यावर मोठ्या आवाजात गाड्या चालवणाऱ्या ''रोडरोमिओ''वर कडक कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com