पान-२ अँकर
फोटो- 14661
ओझर ः द्राक्ष व्यापाऱ्याकडून पैसे परत मिळवण्यात पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करताना शेतकरी.
पोलिसांच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू
शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने अदा केले ६५ लाख रुपये
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता. १३ : द्राक्ष उत्पादकांकडून माल घेऊन व्यापारी पोबारा करत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पोलिस संशयितास अटक करतात. नंतर न्यायालयाच्या चकरा सुरू होतात; मात्र अनेकांची रक्कम अखेरपर्यंत मिळतच नाही. या संपूर्ण वास्तवाच्या उलट ओझर पोलिसांनी संबंधित व्यापारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ६५ लाख रुपये मिळवून दिले.
संशयित हेमंतकुमार सिंग याने शेतकऱ्यांकडून द्राक्षमाल घेत पोबारा केला होता. याप्रकरणी ओझर पोलिसांनी नुकतीच व्यापारी हेमंतकुमार सिंग यास बिहारमधून अटक केली. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठीच बिहार येथे गेल्याचे संशयिताने सांगितले.
पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी व्यापारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधला. हेमंतकुमार सिंग याने पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार २० दिवसांत शेतकऱ्यांचे ६५ लाख रुपये अदा करण्यात आले.
या प्रकरणातील संशयित हेमंतकुमार सिंग (रा. नाशिक) याच्यासह नितीन जंगल रास्कर (रा. ओझर मिग) आणि संशयित कृष्णा रामनाथ निमसे (रा. नांदूर नाका) यांना न्यायालयातून जामीन मिळाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. ओझर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व गणेश गुरव यांनी तपास केला.
..............
कोट
पोलिसांमुळे थकीत रक्कम मिळाली. पैसे मिळाल्याने दिलासा मिळाला असून, पोलिसांचे आभार
- हरीश वाघ, शेतकरी, जानोरी
.........
शेतकऱ्यांची देणी वेळेत देता आली नाहीत. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत उर्वरित रक्कम देण्याचे नियोजन केले. त्यानुसार, २० दिवसांत ६५ लाख रुपये अदा केले.
हेमंतकुमार सिंग, द्राक्ष व्यापारी